जमिनी मधील सेंद्रिय (organic)कर्बन वाढण्यासाठी
जमिनी मधील सेंद्रिय (organic) कर्बन वाढण्यासाठ
१ ते २ वर्षातून एकदा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी किंवा सेंद्रीय शेती सुरू करण्यापूर्वी जमीनीतील उपयुक्त जीवजंतू, गांडुळे, सूक्ष्मजीवाणू व मित्र बुरशीची अल्पावधीत वाढ करून जमीन कसदार बनविण्यासाठी ऍरोग्रीनचा वापर करावा. ऍरोग्रीन बियाणे खालील प्रमाणात मिसळून शेतात वाफसा अवस्थेत पेरावे.
🌾 ताग किंवा धैचा - १० किलो
🌾 बाजरी - ५ किलो
🌿 हरभरा - ५ किलो
☘ उडीद - १ किलो
☘ मटकी - १ किलो
☘ मूग - १ किलो
☘ मेथी - १ किलो
☘ चवळी - ५०० ग्रॅम
🌶 मिरची - ५०० ग्रॅम
🌿 धने - ५०० ग्रॅम
🌻 सूर्यफूल - ५०० ग्रॅम
🌾 अंबाडी - २०० ग्रॅम
🍀 कारले - २०० ग्रॅम
🎋 तीळ - २०० ग्रॅम
🌾 राजगिरा - १०० ग्रॅम
🌻 मोहरी- १०० ग्रॅम
वरील सर्व मिश्रण अंदाजे २७ ते ३० किलो प्रति एकर जमीनीत पेरावे. निरनिराळे वाण एकत्र करताना ऍरोग्रीन बियाणे मिश्रणात किमान ६०% द्विदल, ३०% एकदल, व १०% तागवर्गीय, औषधी, तेलवर्गीय पिकांचा समावेश होईल याची खात्री करावी. पेरणी केल्यानंतर ४५ ते ६० दिवसांनी कोणतेही उत्पन्न न घेता रोटाव्हेटर मारावा किंवा संपूर्ण पिकांची जमीनी लगत कापणी करून बायोमास तेथेच ठेवून कालांतराने वाळवून द्यावे ( आच्छादनासारखे ). त्यामुळे जमिनीत विविध गटाचे सूक्ष्म जीवाणू वाढतात. नैसर्गिकरीत्या गांडूळांची वाढ होऊन जमीन सशक्त बनते. अशाप्रकारे तयार झालेल्या जमीनीवर कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता चांगले उत्पन्न मिळते.
महिती आवडली असल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा
