350 वर्षाची परंपरा: भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, वाचा यावर्षी पाऊस पाणी कसा राहणार?
350 वर्षाची परंपरा: भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, वाचा यावर्षी पाऊस पाणी कसा राहणार?
350_वर्षाची परंपरा_भेंडवळची_भविष्यवाणी_जाहीर_वाचा यावर्षी_पाऊस_पाणी_कसा_राहणार?
राज्यामध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातो. हवामान खात्याचा अंदाजानुसार पावसाचे प्रमाण किती राहील किंवा मान्सूनची स्थिती कशी राहील याबाबतचा अंदाज आपल्याला कळत असतो. परंतु या व्यतिरिक्त संपूर्ण राज्यातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात ती म्हणजे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भेंडवळ या गावच्या भविष्यवाणीची.
या भविष्यवाणीचे 350 वर्षांची परंपरा असून ही प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये देशाची स्थिती तसेच राज्याची स्थिती व पाऊसमान कशी राहील याबाबत भविष्यवाणी केली जाते. शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पुंजाजी महाराज व श्री शारंगधर महाराज यांनी आज म्हणजेच रविवारी घटमांडणी वर्तवली. त्यामध्ये देशाची सुरक्षा व्यवस्थेपासून देशाची आर्थिक स्थिती व पाऊसमान यासंबंधीचे अंदाज व्यक्त करण्यात आले
.यावर्षी पावसाळा साधारण राहणार
भेंडवळ गावच्या भविष्यवाणी च्या संदर्भाने विचार केला तर यामध्ये चार ढेकळांवर ठेवलेल्या घागरीमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे यावर्षी पावसाळा साधारण होईल, असा अंदाज या भविष्यवाणीच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. पहिल्या जून महिन्यात पावसाळा कमी राहील.
कुठे पाऊस कमी तर कुठे जास्त पडेल त्यामुळे सार्वत्रिक पेरणी होणार नाही. तसेच जुलै महिन्यामध्ये देखील पावसाळा साधारण राहील. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये आधी पावसाळा होईल तर शेवटच्या सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस होईल. परंतु अवकाळी पाऊस राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे असे भाकीत शारंगधर महाराज यांनी व्यक्त केले आहे.
जगावर येईल रोगराईचे संकट
यावर्षी कपाशीचे पीक सर्वसाधारण येईल तर तूर व ज्वारी पीक चांगली येईल या पिकांच्या भावात सुद्धा तेजी राहील. तसेच मूग,उडीद साधारण राहील. बाजरी पीक चांगले येईल परंतु त्याचे नासाडी होईल. भादली पीक सर्वत्र विखुरले असल्याने भादली हे रोगराईचे प्रतीक असल्यामुळे सर्व जगावर रोगराईचे संकट ओढवेल.
राजा कायम राहील मात्र तणावात राहील
या भविष्यवाणी मध्ये पानविळा कायम असल्याने देशाचा राजा कायम राहील असे भाकीत वर्तवण्यात आले असून अंबाडी हे पीक आत बाहेर आहे. अंबाडी आपली कुलदैवत असल्याने देशावर प्रकोप आहे. त्यामुळे रोगराईचे संकट येईल. मसूर एक आत बाहेर असल्यामुळे देशात घुसखोरी होईल. पुरी गायब असल्याने देशासहित जगावर रोगराई संकट आहे भाकीत देखील वर्तवण्यात आले आहे.
भेंडवळ गावामध्ये कशी करतात घटाची मांडणी?
अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावाबाहेर शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात आली. या घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर आणि करडी असे 18 प्रकारचे धान्य ठेवण्यात आले. मध्यभागी चार मातीची ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात आली.
घागरीवर पान सुपारी, पुरी,पापड,सांडोळी, कुरडई तसेच भजे व वडे हे खाद्यपदार्थ ठेवले गेले. रात्रभर या ठिकाणी कोणीही नागरिक जात नाही आणि आज रविवारी सकाळी या धान्याच्या झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून श्री. शारंगधर महाराज व श्री पुंजाजी महाराज यांनी पिकाचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला.
