खाद्यतेल आयात शुल्कातील कपात शेतकऱ्यांच्या मुळावर


खाद्यतेल आयात शुल्कातील कपात शेतकऱ्यांच्या मुळावर



देशात यंदा खाद्यतेल आयातीत २० टक्क्यांची वाढ झाली. तरीही आयात शुल्कात वाढ करण्याऐवजी सरकारने बुधवारी (ता. १४) रिफाइंड खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली .

 हे शुल्क १७.५० टक्क्यांवरून १२.५० टक्क्यांवर आणले आहे. आता रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेल आयातीवर एकूण १३.७५ टक्के आयात शुल्क असेल. तर कच्च्या तेलावर ५.५० टक्के शुल्क असेल. 

परिणामी, आधीच दबावात असलेल्या सोयाबीन आणि मोहरीच्या दराला या आयात शुल्क कपातीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार एकूणच शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याची स्थिती आहे.

रिफायनरी उद्योगांना फटका बसण्याची शक्यता


आंतरराष्ट्रीय बाजारात रिफाइंड तेलाचेही भाव कमी झाले आहेत. देशातील खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकार थेट रिफाइंड तेल आयातवाढीचे प्रयत्न करत आहे. पण याचा फटका देशातील रिफायनरी उद्योगांनाही बसू शकतो. तसेच देशातील खाद्यतेलाचे भाव आणखी दबावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण उद्योगांच्या मते, रिफाइंड तेलाचे आयात शुल्क क


मी केले, तरी आयात परवडणारी नाही.

Post a Comment

Previous Post Next Post