वनरक्षक भरती शारीरिक पात्रता 2023
वनरक्षक भरती 2023 सुरू | ऑनलाईन अर्ज लिंक जाहिरात पहा | Vanrakshak Bharti 2023 | Vanvibhag Bharti 2023
Vanrakshak Bharti 2023 : 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे. वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरण्यास सुरुवात झाली आहे. 10वी (अनुसुचित जमाती) व 12वी पास उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली pdf जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. वनरक्षक पदांकरिता केवळ ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे वनविभगात आता वनरक्षक पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे. पुर्ण PDF जाहिरात खाली पहा.
Vanrakshak Bharti 2023 : वनरक्षक भरती 2023 भरतीबद्दल महत्वाची माहिती :
■ वनरक्षक भरतीसाठी 10वी (अनुसूचित जमाती) व १२वी पास आवश्यक आहे.
■ वनरक्षक भरतीसाठी उमेदवार हा 18 वर्षांपेक्षा कमी नसावा व 27 वर्षांपेक्षा जास्त नसावा. वयोमर्यादा काही बाबतीत शिथीलक्षम.
■ मासिक वेतन: 21,700 ते 69,100 रूपये मासिक मानधन मिळणार आहे. (Vanrakshak
Bharti 2023)
शैक्षणिक पात्रता :-
1) उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
2) अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी ) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. (Vanrakshak Bharti 2023) 3) माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
4) नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनख़बरे व वन कर्मचा-यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. (Vanrakshak Bharti 2023)
5) अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे
ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
